माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


ऋतू हिरवा, ऋतू बरवा

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर, सरसरतो मधु शिरवा ॥धृ.॥

भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा ॥१॥

मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर, प्रणयी संकेत नवा ॥२॥

नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा


केशवा माधवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ||

तुझ्या सारखा तूच देवा
तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा ||

वेडा होऊनी भक्तीसाठी
गोप गड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकीशी गोकुळी यादवा ||

वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊनी हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा ||


दर्शन दे रे, दे रे भगवंता

दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पाहसी अनंता ||धृ.||

माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोर्‍या कुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता ||१||

ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे ध्यान देसी तुझ्या प्रिय संता ||२||

तूच जन्मदाता तूचि विश्वकर्ता
मन शांत होई तुझे गुण गाता
हीच एक आशा पुरवी तू आता ||३||

टाळ बोले चिपळीला

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग ॥१॥
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनी हा बोलतो मृदंग ॥२॥
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ॥३॥

झपूर्झा हर्षखेद ते मावळले हास्य निमालें । अश्रु पळाले; कंटक-शल्यें बोथटलीं मखमालीची लव वठली; कांही न दिसे दृष्टीला प्रकाश गेला । तिमिर हरपला; काय म्हणावें या स्थितिला; झपूर्झा,गडे झपूर्झा ! हर्षशोक हे ज्यां सगळें त्यां काय कळे । त्यां काय वळे ? हंसतिल जरि ते आम्हांला, भय न धरु हें वदण्याला:- व्यर्थी अधिकचि अर्थ वसे तो त्यांस दिसे । ज्यां म्हणति पिसे; त्या अर्थाचे, बोल कसे:- "झपूर्झा-जडे-झपूर्झा !" ज्ञाताच्या कुंपणावरुन धीरत्व धरुन । उड्डाण करुन चिदघनचपला ही जाते, नाचत तेथे चकचकते; अंधुक आकृति तिस दिसती त्या गाताती । निगूढ गीति; त्या गीतींचे ध्वनि निघती "झपूर्झा-गडे-झपूर्झा!" कवी: केशवसुत.

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा