टाळ बोले चिपळीला
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगंदेवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग ॥१॥
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनी हा बोलतो मृदंग ॥२॥
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ॥३॥
No comments:
Post a Comment
Leave your comment here