माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टरकमी पडते

ही कविता आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ! कवीचे नाव माहीत नाही, परंतु तो नक्कीच डोळस आहे!
दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमीच पडते !


दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही


सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते


मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो


स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते


आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात


शेवटी काय
दारु दारु असते
कोणतीही चढते...

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम 'पारो की दारु '
याचा मला अजून संशय आहे


प्रत्येक पेग मागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते


तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते...

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !


चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात
सगळे जण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात


प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते


जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही


पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात


रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे


यामुळे धीर येतो, ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते...

परंतु दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते !!!
जयोस्त्तु ते


जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।

मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।

हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।

स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
हिंदु नृसिंह

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?

कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !

उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !


गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - उंबरठा (१९७७)
राग - पटदीप (नादवेध)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


गीत - सुरेश भट
संगीत - कौशल इनामदार
अप्सरा आली

कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली
सोन्यात सजली रुप्यात भिजली रत्‍नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी ऊमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बीजली पाहुन थीजली ईंद्रसभा भवताली

अप्सरा आली ईंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

छ्बीदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार

ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वा-याची
ही नटली थटली जशी ऊमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बीजली पाहुन थिजली ईंद्रसभा भवताली

अप्सरा आली ईंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली


गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर - बेला शेंडे, अजय गोगावले, अतुल गोगावले
चित्रपट - नटरंग (२०१०)
आता वाजले कि बारा

चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा
याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटु कवातरी साजणा ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

ऐन्यावानी रुप माझं ऊभी ज्वानीच्या मी ऊंब-यात
नादावलं खुळंपीसं कबुतर ह्ये माज्या ऊरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
ऊगा घाई कशापायी हाये नजर ऊभ्या गावाची

(नारी गं, रानी गं, हाये नजर ऊभ्या गाचाची)

शेत आलं राखनीला राघु झालं गोळा
शिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझं मला ऱ्हाईना ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

आला पाड झाला भार भरली ऊभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना

(नारी गं, रानी गं, कसं गुपीत राखू कळंना)

मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताचि ही तुम्ही ऱ्हाऊ द्या ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.


गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर - बेला शेंडे
चित्रपट - नटरंग (२०१०)
दिस चार झाले मन

दिस चार झाले मन, पाखरू होऊन
पानपान आर्त आणि झाड बावरून

सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

नकळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून


गीत - सौमित्र
संगीत - अशोक पत्की
स्वर - साधना सरगम
चित्रपट - आईशप्पथ...! (२००६)
आभास हा

कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी; आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !

क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तू ही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती

मी अशीच हासते; उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते; तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा;
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !

मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे

तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !


गीत - अश्विनी शेंडे
संगीत - निलेश मोहरीर
स्वर - वैशाली सामंत, राहुल वैद्य
चित्रपट - यंदा कर्तव्य आहे (???)
नटरंग ऊभा

धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट परवत ऊभा
उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग
पख्वाज देत आवाज झनन झंकार
लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग

रसिक होऊ दे दंग चढु दे रंग असा खेळाला
साता जन्माची देवा पुन्याई लागु दे आज पनाला
हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग
नटरंग ऊभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छ्ननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर ऊपकार
तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार
मांडला नवा सौसार आता घरदार तुझा दरबार
चेतला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग ऊभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छ्ननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो ईच ईनंती यावं जी
किर्पेचं दान द्यावं जी ... हे यावं जी किर्पेचं दान द्यावं जी


गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर - अजय गोगावले, अतुल गोगावले
चित्रपट - नटरंग (२०१०)
वणवा पेट घेत आहे

सावधान ... सावधान ... सावधान ... सावधान
वणवा पेट घेत आहे

काळोखाच्या साम्राज्याला तीट लावुन भागणार नाय
दृष्ट लागली परक्यांची तरीही का तु जागणार नाय
उठ मराठ्या क्षितीज बघ तुला साद देत आहे
सावधान ... सावधान ... सावधान ... सावधान
वणवा पेट घेत आहे

मरहट्याच्या नशीबी जरी दुहीची मेख आहे,
फितुरांना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे
फक्त एक ठिणगी हवी जी बस तुझ्यात आहे
सावधान ... सावधान ... सावधान ... सावधान
वणवा पओट घओत आहो

पुरे झाले मराठीचे ढोंगी कौतुक सोहळे,
प्रधान इथले मस्तवाल अन्‌ सुस्त जाहले मावळे
असो पहाडा परी शत्रू पण तू सुरूंग आहे
सावधान ... सावधान ... सावधान ... सावधान
वणवा पेट घेत आहे


गीत - अरविंद जगताप
संगीत - अवधूत गुप्ते
स्वर - अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर
चित्रपट - झेंडा (२०१०)
कोणता झेंडा घेऊ हाती ?

जगन्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो,
आपली माणसं ... आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचा-या जळति वाती,
वैरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

बुजगावण्या गत व्यर्थ हो जगनं, उभ्या उभ्या संपून जाई,
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे येगळ्या जाती,
सत्येचीच भक्ती सत्येचीच प्रिती, विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?


गीत - अरविंद जगताप
संगीत - अवधूत गुप्ते
स्वर - ज्ञानेश्वर मेश्राम
चित्रपट - झेंडा (२०१०)
पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही
पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही

माफ कर पारो मला, नाही केल्या पाटल्या
मोत्यावानी पिकाला ग नाही कवड्या भेटल्या
"चार बुकं शिक" असं कसं सांगु पोरा
"गहाण ठेवता बापाला का?" विचार कोणा सावकारा
गुरांच्या बाजारी हिथं माणसा मोल नाही
मी नाही बोललो पण पोरा तु तरी बोल काही

ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुम्हा लय पिळून घेतलं
पण कोरड्या जिमीनीनं सारं पिकं गिळून घेतलं
नाही लेकरा भाकर, नाही गुरा चारा
टिपूस नाही आभाळात, गावच्या डोळा धारा
कर्जापायी भटकुन शिर्पा ग्येला लटकुन
दारुपायी गेला असं लिवलं त्यांनी हटकुन
गडी व्हता म्हराठी पन राजाला किंमत नाही

आई तुझ्या खोकल्याचा आवाज घुमतो कानी
नाही मला जमलं ग तुझं साधं औषध-पाणी
मैलोमैल हिथं कुठं दवाखाना न्हाई
रोगर मात्र सहजासहजी कुट बी गावतंय्‌ आई
शेतात न्हाई कामंच, ते जीव द्याया आलं कामी
माजं अन्‌ सरकारचं ओजं आता व्हईल कमी
मरता मरता कळलं हिथं शेतक-या किमत न्हाई


गीत - अरविंद जगताप
संगीत - अवधूत गुप्ते
स्वर - अवधूत गुप्ते
चित्रपट - झेंडा (२०१०)
तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई

तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरंना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी ऊधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो ऊरी पेटला .... खेळ मांडला

सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार, पाठीशी तू ऱ्हा हुबा
ह्यो तुझ्याच ऊंब-यात खेळ मांडला

उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भेगाळल्या भुईपरी जीनं; अंगार जीवाला जाळी
बळ देई झुंजायाला किरपेची ढाल दे
ईनवीती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळलं शीवार
तरी न्हाई धीर सांडला ... खेळ मांडला


गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर - अजय गोगावले
चित्रपट - नटरंग (२०१०)
जे मोठ्या अपयशाची तयारी बालगतात तेच आकाशाला गवसणी घालू शकतात....
कोणी न जानाऱ्या वाटेने मी चालू लागलो.... आणि एवढा फरक पडला...
किनारा दृष्टीआड़ करण्याचं धैर्य अंगी असेल तरच नवे समुद्र शोधता येतात....
महात्मे कसे असावेत यावर वाद घालण्यापेक्षा महात्मा बनण्याचा प्रयत्न करा....
स्वत:ला बनवा एवढं शक्तिशाली,
की नशिबाच्या प्रत्येक वळनावर
भाग्यविधाता स्वत: तुम्हाला विचारेल....
"बोल तुला काय पाहिजे?"
तुम्हाला जे पहावेसे वाटते ते स्वप्न पहा,
तुम्हाला जिथे जावेसे वाटते तिथे जा,
जे बनावेसे वाटते ते बना,
कारण तुमच्याकडे हे सर्व करण्यासाठी एकाच आयुष्य आणि एकाच संधी आहे....
आपले वर्तन बदकांसारखे असू दया... पृष्टभागावर शांत आणि निष्क्रिय दिसू दया पण पाण्याखाली पूर्ण ताकदिनिशी पाय चालवा....
कोणी म्हातारं झालं म्हणून खेलायचे नाही सोडत... तर खेलायचे सोडल्यामुळ लोक म्हातारे होतात....
ताकद न्हवे तर इच्छा आपल्याला पुढे नेते.....
हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरु होतो. अपयश, जर एखादे आलेच, तर ते फक्त य वाटेवरचे एखादे वळण असेल, अंत न्हवे.....
समस्या सोडवण्याचे दोन मार्ग आहेत, एक समस्येला बदला किंवा समस्येप्रमाणे स्वत:ला बदला...
अपयश म्हणजे खाली पड़णे न्हवे, तर पडून न उठने.....
मी एकही हसरा चेहरा बघितला नाही जो सुंदर न्हवता....
संकटं काही लोकांना मोडतात तर काहींना विक्रम मोडायची संधी देतात.....
भविष्य त्यांचं आहे ज्यांना आपल्या स्वप्नांच्या सुंदरतेवर विश्वास आहे....
असे नाही की गोष्टी अवघड आहेत म्हणून आपण प्रयत्न करत नाही....
आपण प्रयत्न करत नाही म्हणून त्या अवघड वाटतात....
देवाला नका सांगू तुमच्या समस्या किती मोठ्या आहेत...
समस्यांना सांगा तुमचा देव किती मोठा आहे ते...
तुम्ही जेवढे कष्ट घ्याल, नशीब तेवढंच तुम्हाला साथ देइल...
यश म्हणजे स्पर्धेत राहण, जोपर्यंत इतर लोकं थकत नाहीत तोपर्यंत...
एक व्यक्ति आपलं भविष्य बदलू शकतो, फक्त स्वत:चा दृष्टिकोण बदलून...
यश आणि अपयाशातलं अंतर फक्त एखाद्याच्या इच्छेनेच मोजलं जावू शकतं...
जर तुम्ही भरारी घेण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत तर तुम्हाला कधीच समजणार नाही, तुम्ही किती उंच जावू शकता...
अशक्य नेहमीच शक्यतांमधे रूपांतरित होवू शकतं....
तुमच्या परवानगी शिवाय कोणीही तुम्हाला निच लेखु शकत नाही....
मनावर राज्य करा नाहीतर ते तुमच्यावर राज्य करेल..
एका क्षणाचं यश वर्षांच्या अपयशाची भरपाई करतं..
जीवनातला सगळ्यात मोठा आनंद अशा गोष्टी करण्यात आहे, ज्या लोकं बोलतात की अशक्य आहेत....
जीवनातली बरीच अपयशं अशा लोकांची असतात ज्यांना कळत नाही की ते यशाच्या किती जवळ होते....
ते सर्वकाही करू शकतात, कारण त्यांना वाटतं की ते करू शकतात.....
जेंव्हा एक व्यक्ति स्वतःला निच लेखुन मागे हटत असते, दूसरी व्यक्ति चूका करुन यशस्वी होण्यात गर्क असते.....
जेंव्हा तुम्ही सराव करत नसता, लक्षात ठेवा, कोणीतरी कुठेतरी सराव करत आहेत..... आणि जेंव्हा तुमची भेट होईल, तो जिंकेल....
गुलाबाला काटे आहेत म्हणून रडणं किंवा कट्यांमधे गुलाब आहे म्हणून आनंदित होणं, दोन्ही तुमच्या हातात आहे...
दिशा ही वेगापेक्षा महत्वाची असते... आपण वेगावर इतका लक्ष देतो की दिशा पहायची राहुनच जाते....
समस्या ही एक संधी असते सर्वोत्तम कामगिरी करण्याची....
कदाचित आपले मूल्य किती यापेक्षा आपण कसे मौल्यवान आहोत हें ठरवने जास्त महत्वाचे असते....
अनुभव हा एक कड़क शिस्तीचा शिक्षक आहे.... तो आधी परीक्षा घेतो आणि मग धडा शिकवतो....
अपयश अशी कुठली गोष्टच नाही.... आहेत ते फक्त अनुभव आणि तुमच्या त्यावरील प्रतिक्रिया...
यशाच्या वाटेतला सगळ्यात मोठा अड़थला म्हणजे अपयशाची भीती....
जी गोष्ट करताना आपल्याला आनंद होत नाही, त्या गोष्टीत आपल्याला क्वचितच यश मिळते...
एखादी गोष्ट करण्याचा उत्साह सगळे अड़थले पार करण्यास मदत करतो....
जेंव्हा मला धावता येईल, मी धावेन...
जेंव्हा मला चालता येईल, मी चालेन...
जेंव्हा मला रांगता येईल, मी रांगत जाईन....
पण माझा धेयप्राप्तिचा प्रवास चालूच राहिल.....
तुमचा दृष्टिकोण तुमची उंची ठरवतो.
बंदरात जहाजं सुरक्षित असतात पण बंदरात राहण्यासाठी का जहाजं बनवली जातात??
कृतिविना विचार म्हणजे दिवास्वप्न...
आणि विचाराविना कृति म्हणजे दू:स्वप्न......
मोठ्यात मोठे काम पूर्ण करण्यासाठी लागणारी पाहिले गोष्ट म्हणजे आत्मविश्वास..
तुम्ही तो बदल बना जो तुम्हाला बघायचायं...
संधि म्हणजे उधाणलेल्या समुद्रामधाले सुंदर बेट... तिथे तोच पोहोचतो जो त्या लाटांची पर्वा न करता समुद्रात उतरतो....
न हसता घालवलेला दिवस म्हणजे आयुष्यातील वाया गेलेला दिवस...
आयुष्य दोनच प्रकारे जगता येते... एक प्रत्येक गोष्ट चमत्कार आहे असे समजुन किंवा काहीच चमत्कार नाही असे समजुन.....
धाडस म्हणजे भीतीचा आभाव न्हवे,
तर त्यापेक्षाही इतर काही गोष्टी महत्वाच्या आहेत याची जाणीव...
फक्त पंख असले
म्हणजे भरारी घेता येत नाही...
क्षितिजाची ओढ़ रक्तातच असावी लगते........
त्याच्याकडे काय मागायचं
हेच आपल्याला कळत नाही
म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही
पावसावरच्या निबंधाला
कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
कारण मार्क देणारा आणि घेणारा
दोघांनाही तो कळत नाही
चिंब पावसानं रानं झालं आबादानी

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी
गंध फुलांचा गेला सांगून

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन

सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत भावना गेली बांधून

विरह संपता मिलनाची अमृतगोडी चाखीत असता
सखया अवचित जवळी येता ढळे पापणी, गेले लाजून

मनामनांच्या हर्षकळयांची आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची गुंफून सखया तुलाच वाहीन

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा