चिंब पावसानं रानं झालं आबादानी

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी
गंध फुलांचा गेला सांगून

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन

सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत भावना गेली बांधून

विरह संपता मिलनाची अमृतगोडी चाखीत असता
सखया अवचित जवळी येता ढळे पापणी, गेले लाजून

मनामनांच्या हर्षकळयांची आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची गुंफून सखया तुलाच वाहीन