गारवा...
ऊन जरा जास्त आहे... दर वर्षी वाटतं...
भर ऊन्हात पाऊस घेऊन... आभाळ मनात दाटतं...
तरी पावलं चालत राहतात... मन चालत नाही...
घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही...
तितक्यात कुठून एक ढग सुर्यासमोर येतो...
ऊन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो...
वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राहतो...
पानांफुला झाडांवरती छपरांवरती चडून पाहतो...
दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ...
ऊन्हामागुन चालत येते गारगार कातरवेळ...
चक्क डोळ्यांसमोर ऋतू कुस बदलून घेतो...
पावसाआधी ढगांमध्ये... कुठून गारवा येतो...
No comments:
Post a Comment
Leave your comment here