असा बेभान हा वारा...
असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ...
जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू...
कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू...
जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे, तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ....
- मंगेश पाडगांवकर
माय मराठी
ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....
या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....
---- अजय नरेवाडे

जाणता राजा

जाणता राजा
No comments:
Post a Comment
Leave your comment here